
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गृह विलगीकरण संकल्पना यशस्वी झाली, परंतु दुसऱया लाटेची तीव्रता जास्त असल्यामुळे गृह विलगीकरणाचा विचार काही ठिकाणी बंद करून संस्थात्मक विलगीकरण या पर्यायाचा विचार करावा लागला. सातारा जिह्यातील माण तालुक्यातील बिदाल व गोंदवले बु. या गावांमध्ये प्रशासन आणि सामाजिक संस्था व गावकऱयांच्या सहकार्याने उभे करण्यात आलेल्या कोरोना सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना उपचाराबरोबर मानसिक आधारही दिला जात आहे.
जे रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल आहेत त्यांना औषधोपचार, आरोग्याची तपासणी डॉक्टर व आशा वर्कर करीत आहेत. सेंटरमध्ये अत्यंत चांगली सुविधा असल्यामुळे रुग्ण आढळला तर तो गृह विलगीकरणात न राहता सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. रुग्णांकडून रोज सकाळी आणि संध्याकाळी योगा तसेच इतर व्यायाम प्रकार करून घेतले जात आहेत. याचा त्यांच्या आरोग्य व मानसिकेतवर चांगला परिणाम झाला असून अंतिगंभीर रुग्णही या सेंटरमध्ये बरे झाले आहेत. बिदाल व गोंदवले बु. या गावांनी कोरोना महामारीच्या संकटात आदर्शवत काम करत कोरोनामुक्तीकडे जाण्याचा राजमार्ग इतर गावांना दाखवला आहे.
- माण तालुक्यातील बिदाल हे जवळपास सात हजार लोकसंख्या असलेल गाव. या गावाने कोरोनाच्या दुसऱया लाटेत ‘विकास सेवा मंडळा’च्या माध्यमातून गावात अतिशय उत्तम काम केले आहे. या मंडळाने गावामध्ये तीन कोरोना केअर
सेंटरमधून 50 बेडची निर्मिती केली आहे. - आम्ही गोंदवलेकर सामाजिक संस्था व जयंतीलाल मोदी फाऊंडेशन, ग्रामपंचायत व ड्रीम फाऊंडेशनचे काम कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. गोंदवले येथे 36 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल व 100 बेडचे कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमुळे गोंदवले बु. व आसपासच्या गावातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठी मदत होत आहे.
हॉटस्पॉट गावांना भेटी
गोंदवले बु. व आसपासच्या जवळील गावांना भेटी देऊन प्रत्येक घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जो बाधित आढळला त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये तत्काळ दाखल करण्यात येत आहे. जो रुग्ण गंभीर असला तर त्याला रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात येत आहेत. तत्काळ उपचार मिळाल्यामुळे मृत्यूचाही दर कमी होण्यास मोठी मदत मिळत आहे.
मुंबई-पुण्यातून मदत
- बिदाल गावातील या तीन सेंटरला मुंबई, पुणे तसेच इतर जिह्यातूनही पैशांची तसेच उपयुक्त वस्तूंची मदत मिळत आहे. विकास सेवा मंडळाने एक बँक खाते बँकेत काढले आहे. त्याची माहिती गावातील प्रत्येक नागरिकाला व्हावी यासाठी एक व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. कोरोना केअर सेंटरसाठी करण्यात आलेला खर्च प्रत्येक आठ दिवसांनी या ग्रुपवर टाकण्यात येतो.
- हॉस्पिटलमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक कामासाठी टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये औषध साठा, जेवण, बेडचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत.




























































