मुसळधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरू वाहू लागल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात संध्याकाळी सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

सध्या शेतीमधील कामांनी वेग घेतला आहे. पावसामुळे भात मळीमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. नालेही भरून वाहू लागले आहेत. सोनवी आणि शास्त्री नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पुलाची कामेही थांबली आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्याने नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.