राज्यातील हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा)आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस या स्पर्धात्मक परीक्षेविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या या परीक्षेतील टक्का फारच कमी आहे. लोकसेवा आयोगाबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा यशस्वी होण्याचा टक्का अधिकाधिक वाढून ते प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी शिवसेना गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते विजय कदम यांनी शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीतून आतापर्यंत 65 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष दि. 19 जून 2021 रोजी सुरू होणार आहे. बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीच्या वतीने प्रत्येक वर्षीप्रमाणेच निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन एक वर्ष कालावधीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पूर्वनोंदणी करून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असून या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. यूपीएससीमध्ये करीअर करू इच्छिणाऱया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिवसेना उपनेते बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीचे संस्थापक संचालक विजय कदम यांनी केले आहे. संपर्कः बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमी, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 25.

प्रवेश घेण्याची प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज भरणे – 19 जून ते 18 जुलै
  • राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश परीक्षा – बुधवार 21 जुलै 2021 सकाळी 11 ते 1 पर्यंत
  • प्रवेश परीक्षा निकाल – मंगळवार दि. 27 जुलै 2021
  • प्रशिक्षण प्रवेश प्रकिया – मंगळवार 27 जुलै ते शनिवार 31 जुलैपर्यंत
  • प्रशिक्षण वर्ग सुरू – रविवार 1 ऑगस्ट 2021

प्रवेश अर्ज उपलब्ध

ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांसाठी www.svpias.comed या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज लिंक https://e&samed.svpias

मुख्य परीक्षेसाठी दिल्ली गाठण्याची गरज नाही

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या कठीण अभ्यासासाठी दिल्ली गाठावी लागते हा गैरसमज या उपक्रमातून दूर केला जाणार असल्याचे बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीचे संस्थापक, शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले. परीक्षेसाठी महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱया विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व राहण्यासाठी पाच लाख रुपये खर्च येतो. सामान्य विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके परवडत नाहीत व योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. त्यामुळे पात्रता असूनही मराठी उमेदवार मागे पडत असल्याचे ते म्हणाले.