पुणे – मोक्क्यातील सराईत फरारीला अटक, सहकारनगर पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोक्क्याच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दुचाकी, पालघन, नकली पिस्तूल, असा 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. विवेक रमेश शेवाळे असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

सहकारनगर पोलिसांच्या प्रस्तावानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानुसार टोळीतील आठजणांना मुळशी आणि कोल्हापूरमधून अटक केली होती. मात्र, टोळीतील सराईत विवेक शेवाळे फरार झाला होता. तो साताऱ्यातील येळगावात असल्याची माहिती महेश मंडलीक आणि सागर शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापु खुटवड, प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, किसन चव्हाण, प्रदीप बेडीस्कर, शिवलाल शिंदे यांच्या पथकाने केली.