
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
मराठा काळात स्त्र्ायांना आणि मुलींना गृहकृत्यदक्षतेबरोबरच धार्मिक, कुटुंबाचे कुळाचार, हिशोब याशिवाय परंपरागत व्यवसाय सांभाळण्याचे शिक्षण आणि कौशल्यही शिकविले जात असे. तसेच लढाईतील चकमकी, कुटुंबाच्या पूर्वजांनी केलेले पराक्रम आदींची वर्णने केलेली स्त्र्ााr पत्रेही आढळतात. या सर्व पत्रांमधून मराठेकालातील स्त्र्ायांना सरासरी लिहिणे, वाचणे, व्यवसाय, व्यवहारज्ञान याची उत्तम जाण होती असे लक्षात येते.
पेशवे घराण्याच्या इतिहासानुसार 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर पेशवे कुटुंबातील स्त्र्ाया हिंदुस्थानबाहेर नेपाळमध्ये काठमांडूजवळ थपाथळी या गावी स्थायिक झाल्या. या स्त्र्ायांना इंग्रज राजवटीचा त्रास अतिशय भोगावा लागला तरी पण न डगमगता धीटपणे परदेशात या हिंदुस्थानी महाराष्ट्रीयन स्त्र्ाया खंबीरपणे जगल्या. जवळचे जडजवाहीर विकून या स्त्र्ायांनी थपाथळी गावात राहता वाडा व श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर बांधून घेतले. या वास्तूतच या स्त्र्ाया निधन पावल्या. काठमांडूजवळील पशुपतीनाथ मंदिराजवळील नेपाळच्या राजघराण्याच्या शाही परिवाराच्या स्मशानात या मराठाशाही स्त्र्ायांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नेपाळातील थपाथळी गावातील कृष्णमंदिर आणि या मंदिरातील पेशव्यांची हकीकत सांगणाऱया संस्कृत शिलालेखाच्या रूपाने या स्त्र्ाया मराठा इतिहासात आज अमर आहेत.
पेशवा माधवराव नारायण ऊर्फ सवाई माधवराव
मराठाकाळात शिक्षण हे मुख्यतः उद्योगावर अवलंबून होते. शेती व्यवसाय, लष्करी शिक्षण, वैद्यकी, लोहार, कुंभार, शिंपी, पुरोहित, ज्योतिषी असे व्यवसाय घरोघर पिढीजात परंपरेप्रमाणे आणि ग्रंथाचा आधार घेऊन घरोघरी शिकवले जात. आपल्या व्यवसायात पारंगत असणे हा जगण्याचा मंत्रच शिक्षण असे.
स्त्र्ायांना – मुलींना गृहकृत्यदक्षते-बरोबरच धार्मिक पोथ्यांचे वाचन, कुळाचार, हिशोब याबरोबरच पित्याच्या व पतीच्या व्यवसायात मदत करण्यासाठी घरातील परंपरागत व्यवसायाचे शिक्षण मिळत असे.
आपली परंपरागत वतने, व्यवसाय सांभाळणाऱया तुकाई निगडे, दीपाई बांदल, पिलाई पिसाळ अशा देशमुखिणी, पाटलीण, सई कुलकर्णी, भिऊबाई देशपांडे, जानकी ठकार, मती कुंभारीण, सावित्री लोहारीण अशा आपापल्या व्यवसायात लक्ष घालणाऱया स्त्र्ायांबरोबरच स्त्र्ााr हरदास म्हणजे कीर्तन करणाऱया बयाबाई गोसावीण चाफळकर, जिऊबाई कथेकरीण अशा स्त्र्ााr कीर्तनकारांची नावेही मराठा इतिहासात वाचता येतात.
रामायण-महाभारत, उपनिषदे, भागवत, वैद्यक अशा ग्रथांची मागणी करणारी स्त्र्ााr पत्रे मराठा इतिहासात आहेत. अशा पत्रांबरोबरच राजकारणात सक्रिय असणाऱया आपल्या पतीला, पुत्राला आणि परप्रांतात असणाऱया मराठा सरदारांना लिहिलेली राजकारणी पत्रे, लढाईत झालेल्या चकमकींची वर्णने, लढाईच्या सामानाचा पुरवठा व वाहतूक याचे वृत्तांत सांगणारी लष्करी स्त्र्ााr पत्रे, यात्रेचे प्रवासवर्णन पत्रे आणि घराण्यांच्या कैफियतीमधून आलेल्या स्त्र्ायांच्या हकीकतीची पत्रे वाचताना मराठेकाळातील स्त्र्ायांना सरासरी लिहिणे, वाचणे, व्यवसाय, व्यवहारज्ञान याची असलेली उत्तम जाण समोर येते.
मराठा सरदार आणि पेशवे कुटुंबातील स्त्र्ायांनी लिहिलेली अनेक पत्रे आज उपलब्ध आहेत. या स्त्र्ायांचे शिक्षण व सुशिक्षितपणाचे एक उदाहरण म्हणजे गोपिकाबाईंचे, नानासाहेब पेशव्यांची पत्नी गोपिकाबाई या राजकारणी, धोरणी, चतूर, मुत्सद्दी आणि प्रेमळही होत्या हे त्यांच्या काही पत्रांतून आणि चरित्रातूनही समजतेच, पण त्यांची इतिहासाबाबतची जाण दोन गोष्टींवरून सिद्धही होते.
मराठय़ांचा इतिहास पुढील पिढीने वाचावा यासाठी गोपिकाबाईंनी ‘पानिपतची बखर’ रघुनाथ यादव यांच्याकडून लिहून घेतली. पानिपत हे मराठय़ांच्या इतिहासातील दुर्दैवी निस्तेज पान आहे. पानिपताच्या युद्धातून परत आलेल्या स्त्र्ाया, जखमी माणसे गोपिकाबाईंनी प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचा मुलगा विश्वासराव आणि पुतण्या सदाशिवभाऊ पानिपतावर वीरगतीला प्राप्त झाले होते. पानिपतची सर्व हकीकत त्यांनी प्रत्यक्ष ऐकली होती. त्यामुळे या बखरीत पानिपत युद्धाचे, खर्चाचे आणि पराजयाचे सत्य वर्णन लिहिले गेले आहे. पानिपतची बखर हा मराठय़ांच्या इतिहासाचा अनमोल ठेवा या स्त्र्ााrने आपल्यापुढे आणला आहे.
गोपिकाबाईंनी पेशवेपदाचा अधिकार, मान, जबाबदारी फार जवळून अनुभवली होती. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव अवघा सव्वा महिन्याचा असताना पेशवेपदावर आरूढ झाला होता. या लहानग्या सवाई माधवरावांच्या मुंजीनंतर ते नऊ-दहा वर्षांचे असताना गोपिकाबाईंनी आपल्या नातवाला पेशवेपदाचे रिवाज आणि रोजची दैनंदिन चर्चा कशी असावी याबरोबरच वाचन, मनन, लिखाण, गुणाकार, भागाकार, बेरीज-वजाबाकी, ताळेबंद असा अभ्यास, कुस्ती, दंडबैठका असा व्यायाम, स्वतःचा व लहान-मोठय़ांचा मान, सुसंगत देवधर्म, तिरंदाजी व घोडा चालवणे असे लष्करी शिक्षण, गुप्तहेर, बातमीदार यांच्या बरोबरचा व्यवहार, पराक्रमी पूर्वजांचे स्मरण, इतिहास अशाविषयी तेरा कलमी यादी लिहून पाठवली होती.
या यादीमध्ये ‘बातमीदार यांनी वर्तमान गुप्त सांगत असावे, बातमीची पत्रे पाहावीत, पत्रे विश्वासू माणसाकडे द्यावीत, बातमी प्रमाण की अप्रमाण याची चौकशी करावी. बातमी हरतऱहेची राखावी, एखाद्याचा अपराध ठरला तर पक्केपणी विचार करून पारपत्य करावे. रद्दबदली केली तर क्षमा करावी. दुसऱयाचे क्षुद्र काढू नये’, अशा सूचनांबरोबर सुशिक्षित गोपिकाबाई पुढे लिहितात, ‘अनेक तसबिरा-नकाशे पाहावेत. वृद्ध मनुष्ये, शहाणे असतील त्याजकडून छत्रपती शिवाजी महाराज, दिल्ली प्रकरणे, असे पूर्वजांचे पराक्रम ऐकावेत.’
काव्येइतिहास संग्रहात छापलेली गोपिकाबाईंची ही तेराकलमी यादी मराठाकाळातील मुलांवरील संस्कारांचा परिपाठच आहे.
अफझल खानाला ठार करायला जाताना ‘शिवबा संभाजीचे उसने घ्या’ म्हणजे ज्या अफझल खानाने संभाजीराजांना म्हणजे तुमच्या मोठय़ा भावाला कपटाने मारले, त्या अफजल खानाला तुम्हीही ठार करा,’ असे लढाऊपणाचे शिक्षण देणाऱया मातोश्री जिजाऊबाईसाहेब, सखी राज्ञी जयती असा पतीप्रेमावरील शिक्का उमटविणाऱया सुसंस्कृत महाराणी येसूबाई, मोगल सैन्यापुढे मराठय़ांचे स्वातंत्र्य आणि राज्य स्वबळावर जिवंत ठेवणाऱया लढाऊ ताराराणी, आपल्या देशभक्तीने, दानशूरपणाने पुण्यश्लोकपदावर पोहोचलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी तर हिंदुस्थानातील ज्योतिर्लिंगाचे नकाशे तयार करून घेऊन या शिवमंदिरांतील बांधकामे इंदूरमध्ये राहून पूर्ण केली, असे त्यांचे चरित्रकार सांगतात. या व अशा अनेक मराठेकालीन स्त्र्ाया सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत आहेत हे मराठा इतिहासातील कागदपत्रांच्या अभ्यासातून समोर येते.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत)
n [email protected]




























































