Video – हैद्राबादमध्ये कारची रिक्षाला जोरात धडक, प्रवाशाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैद्राबामध्ये एक कारचालकाने रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.


हैद्राबादच्या सायबराबाद मध्ये रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ऑडी कारने एका रिक्षाला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.