मला मुस्लिम लोक नाही आवडत; असे म्हणत पाकिस्तानी नागरिकाची दाढी छाटून भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीवर तीन जणांनी हल्ला केला आहे. यात पाकिस्तानी व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला 14 टाके पडले आहेत.

कॅनडामध्ये सास्कटून शहरात मोहम्मद काशिफ हे आपल्या मार्गाने जात होते, त्यांनी पारंपारिक मुस्लिम पद्धतीचा सदार घातला होता. तेव्हा दोन तरुण आले आणि काशिफ यांना मारहण केली, तु अशा प्रकारचे कपडे का घातलेस? असे म्हणून एका तरुणाने काशिप यांना चाकूने भोसकलले तसेच तु दाढी पण ठेवली असे रागावून म्हणत एका तरुणाने त्यांची दाढीही छाटली आणि मला मुस्लिम लोक आवडत नाही, तु तुझ्या देशात निघून जा असेही तो तरुण म्हणाला आणि आपल्या साथीदारासह पळून गेला.

काशिफला रुग्णालयात दाखल केले असून त्याला 14 टाके पडले आहेत. काशिफची प्रकृती स्थिर असून झाल्या प्रकाराबद्दल शहराच्या महापौरांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच देशात वाढत जाणार्‍या इस्लामफोबियाचा त्यांनी निषेधही केला आहे.