
आठ दिवस दडी मारल्यानंतर आज दुपारी पावसाने चंद्रपुरात जोरदार हजेरी लावली. यामुळे लोकांची त्रेधा उडाली. गेल्या आठ दिवसांपासून चंद्रपूरकर प्रचंड उकाडा सहन करीत होते. मात्र आज पावसाने हजेरी लावताच वातावरणात गारवा निर्माण झाला.
अचानक बरसलेल्या पावसामुळे लोकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला. पावसाअभावी जिल्ह्यात शेतीच्या कामांना अजूनही म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. मृगाचा महिना आता लोटला असला तरी शेतीसाठी योग्य पाऊस पडलेला नाही. आज पडलेला पाऊसही पुरेसा नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट बघत आहेत.
पाहा व्हिडीओ-





























































