नराधम बापाने दारूच्या नशेत 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नातेसंबंधाला लाज आणणारी घटना मध्य प्रदेशातील खंडावा येथे घडली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनीच दारूच्या नशेत बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केला. वडिलांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ती रात्री तिच्या काकांच्या घरी निघून गेली. काकांना तिने वडिलांकडून घडलेला प्रकार सांगितला. तसेच याबाबत आपण पोलिसांत तक्रार दाखल करुया म्हणजे वडील सुधारतील असे त्यांना सांगितले. त्यामुळे पीडित मुलीने आणि तिच्या काकांनी सकाळी आरोपी वडिलांची तक्रार पोलिसांत केली.

वडिलांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीने वडिलांवर केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोक्सो कायद्याअंतर्गत वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही भोपाळमध्ये शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. बरेच महिने त्या अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार सुरू होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. यातील तीन विद्यार्थी पीडित मुलीसोबत शाळेत शिकतात, तर एकजण हॉटेलमध्ये काम करतो.

बलात्काराच्या या घटनांबाबत मध्य प्रदेश सरकार आरोपींची पॅरोलवर सुटका करत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटिस बजावली आहे तसेच डॉक्टर पीजी नाजपांडे यांनी न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात राज्य सरकार तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी बलात्कारासारखे दुष्कर्म केलेल्या आरोपींचीही पॅरोलवर सुटका करत आहे. त्यामुळे आरोपींना बाहेर फिरण्याची सूट मिळते. त्यामुळे आता ही बाब गांभीर्याने घेत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून यासंदर्भातील उत्तर मागितले आहे.