आयुर्वेदिक बालरोगतज्ञ परिषदेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि आयुर्वेदिक औषधाची पार्श्वभूमी मजबूत करण्यासाठी दोन दिवसांच्या ऑनलाइन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जुलैपासून केरळमधील वैद्यरत्नम समूहाच्या मुख्यालयात ही परिषद होणार आहे. वैद्यरत्नम समूहाचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत देशभरातील आघाडीच्या वैद्यकीय संस्थांचे बालरोगतज्ञ सहभागी होतील. या संस्थांमध्ये नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), कन्नूरमधील आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि जयपूरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद यांचा समावेश आहे. हे बालरोगतज्ञ परिषदेत कोरोनाच्या सध्याच्या आणि मागील लहरीच्या प्रकरणांच्या अभ्यासासह त्यांचे नैदानिक अनुभवदेखील सांगतील.