पुणे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कोळपकर; उपाध्यक्षपदी ‘सामना’चे डांगे, कार्यकारिणी सदस्यपदी नवनाथ शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘दैनिक सकाळ’चे मंगेश कोळपकर तर, सरचिटणीसदी ‘महाराष्ट्र टाईम्स’चे डॉ. सुजित तांबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी ‘दैनिक सामना’चे वृत्तसंपादक सुदीप डांगे यांची आणि कार्यकारीणी सदस्यपदी नवनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 2021-22 या वर्षीची कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्ष – विकी कांबळे (झी 24 तास), खजिनदार – निलेश राऊत (लोकमत), चिटणीस – प्रसाद पाठक (आज का आनंद), दिलीप तायडे (केसरी). कार्यकारिणी सदस्य गणेश आंग्रे (प्रभात), प्रशांत चव्हाण (बेळगाव तरुण भारत), अस्मिता चितळे (महाराष्ट्र टाईम्स), चंद्रकांत फुंदे (न्यूज 18 लोकमत), सुनिल गाडेकर (सकाळ), प्रसाद जगताप (पुढारी), रुपेश कोळस (केसरी), अभिजीत कोळपे ( लोकमत), गणेश वाघमोडे (पुण्यनगरी), राहुल देशमुख (पुणे मिरर), मंगेश देशमुख (पुढारी), संदीप घोडके (प्रभात) यांची निवड करण्यात आली आहे. अ‍ॅड. प्रताप परदेशी व अ‍ॅड. स्वप्निल जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.