लेख – पायाभूत सुविधांच्या उभारणीत ‘झिंक’चे महत्त्व!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. राहुल शर्मा

आपल्या स्थानिक संलग्न संघटनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेली इंटरनॅशनल झिंक असोसिएशन म्हणजेच ‘आयझेडए’ स्टीलचे गंजापासून संरक्षण करण्याच्या कामी झिंकचे असलेले महत्त्व आणि मानवी आरोग्य व पिकांचे पोषण यांसाठी या धातूची अनिवार्यता यांसारख्या प्रमुख उपयोगांना प्रोत्साहन देत जागतिक स्तरावर झिंकला व या धातूच्या बाजारपेठेला असलेली दीर्घकालीन मागणी टिकून राहावी यासाठी मदत करते. शाश्वत विकास आणि पर्यावरण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ विकास आणि संपर्क हे या असोसिएनशचे प्रमुख कार्यक्रम आहेत.

झिंक अर्थात जस्त हा धातू शरीराची रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यास मदत करतो. या धातूच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर अशा या गुणधर्मांमुळे गेल्या वर्षी पॅनडेमिक सुरू झाल्यापासून त्याला नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे आणि घरोघरी चालणाऱया चर्चांमधला तो एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

शरीराला बळकटी पुरविणारा हा धातू बांधकाम संरचनांसारख्या इतर क्षेत्रांसाठीही तितकाच फायदेशीर आहे. झिंकला ‘गॅल्व्हनायझिंग मेटल’ असे म्हटले जाते, कारण स्टीलचे संरक्षण करणे हे त्याचे काम असते. खरे तर वर्षभरात वापरल्या जाणाऱया एकूण झिंकपैकी 70 टक्के झिंक हे गॅल्व्हनायझेशन किंवा विलेपनाच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. स्टील-फ्रेम इमारती आणि पुलांपासून ते फर्निचर आणि वाहनांच्या सुटय़ा भागांपर्यंत सगळीकडे एक टिकाऊ संरचनेच्या उभारणीसाठी जस्तविलेपित अर्थात गॅल्व्हनाइझ्ड स्टीलची महत्त्वाची भूमिका असते. झिंकचे पत्रे किंवा झिंकचे कोटिंग असलेले स्टीलचे पत्रे हे क्लॅडिंग किंवा आवरण घालण्यासाठी, रूफिंग अर्थात छतासाठी, खिडक्यांच्या चौकटींसाठी, पावसाचे पाणी गोळा करणाऱया यंत्रणांमध्ये, हीटिंग उपकरणांमध्ये आणि काऊंटर टॉप्ससाठी सर्वोत्कृष्ट साहित्य आहे. हिंदुस्थान पायाभूत सोयीसुविधांचा विशाल स्तरावर विस्तार करण्याच्या मार्गावर असल्याने बांधकामाच्या क्षेत्रातील गॅल्व्हनाइझ्ड स्टीलचा वापर वाढणार आहे.

कन्टिन्युअस गॅल्व्हनाइझ्ड रीबर (CGR) हे अधिक काळ टिकण्याच्या दृष्टीने आणि देखभालीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने काही अधिकचे गुणधर्म जोडलेले रीबर म्हणजे जस्तविलेपित पोलादी सळ्या असतात, ज्यांच्यामुळे इतर गंजरोधक रीबर यंत्रणांच्या तुलनेत खूपच किफायती ठरतात. हे रीबर अंतिम उत्पादनाचा ऑन-साइट फॉर्मेबिलिटी मिळवून देऊ शकतात व अधिक चांगले गंजरोधक असलेले हे रीबर इतर गंजरोधक रिबरपेक्षा (एपोक्सी कोटिंग आणि सीआरएस रीबर) स्वस्त दरात मिळतात. हे रिबर्स विलेपनरहित रिबरइतक्याच चांगल्या प्रकारे कॉन्क्रीटमध्ये घट्ट बसतात व त्यामुळे मोठय़ा कॉन्क्रीट बांधकामांचे आयुर्मान दुपटीने वाढते. असे असूनही गॅल्व्हनाइझ्ड आणि विशषतः CGR चा वापर मर्यादितच राहिला आहे.

सतत वाढत्या लोकसंख्येसाठी ऊर्जा आणि बांधकाम साहित्याला व बांधकाम उद्योगक्षेत्राला प्रचंड मागणी असल्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा ऱहास होत असल्याने अपरिवर्तनीय असे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे. अशावेळी चालू आणि भविष्यातील पिढय़ांच्या वापरासाठी शाश्वत, टिकाऊ घरांचे पर्याय तयार करण्याच्या सुयोग्य तत्त्वाचे पालन करणाऱया बांधकाम पद्धती विकसित करणे महत्त्वाचे ठरत आहे. इमारत बांधकामामध्ये झिंक कोटेड लाइट गॉज स्टील फ्रेमिंग (LGSF) यंत्रणेचा वापर हे असेच एक तंत्र आहे व गेल्या काही वर्षांपासून तिला महत्त्वही प्राप्त झाले आहे.

घाऊक घरांच्या उभारणीसाठी नवीन बांधकाम यंत्रणा अमलात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बिल्डिंग मटेरिअल्स आणि टेक्नॉलॉजी प्रमोशन काwन्सिलणे झटपट सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार घरे बनविण्यास मदत करू शकतील अशा यंत्रणांचा शोध घेऊन त्यांचे मूल्यमापन केले आहे. काऊन्सिलने अशा प्रकारच्या मूल्यमापनातून पार पडलेल्या व काऊन्सिलद्वारे पुरस्कृत अशा काही तंत्रज्ञानांमध्ये LGSF चीही निवड केली आहे व प्रधानमंत्री आवास योजनेत  तिच्या वापरासही मान्यता मिळाली आहे. या पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करून आजवर 1.5 लाख घरे बांधण्यात आली आहेत.

जगभरातील झिंक उद्योगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काही अग्रगण्य झिंक व स्टील उत्पादकांच्या गटाने 1991 मध्ये इंटरनॅशनल झिंक असोसिएशन (IZA) ची स्थापना केली. आपल्या बाजारपेठेचा शाश्वतरीत्या विस्तार करणे, तसेच संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि झिंकच्या मोलाबाबत माहितीचा प्रसार यांसारख्या परिणामकारकरीत्या व्यवस्थापित उपक्रमांच्या माध्यमातून या उद्यगक्षेत्राचा परवाना टिकवून ठेवणे ही इंटरनॅशनल झिंक असो.ची कामे आहेत. आपल्या स्थानिक संलग्न संघटनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेली ‘आयझेडए’ स्टीलचे गंजापासून संरक्षण करण्याच्या कामी झिंकचे असलेले महत्त्व आणि मानवी आरोग्य व पिकांचे पोषण यांसाठी या धातूची अनिवार्यता यांसारख्या प्रमुख उपयोगांना प्रोत्साहन देत जागतिक स्तरावर झिंकला व या धातूच्या बाजारपेठेला असलेली दीर्घकालीन मागणी टिकून राहावी यासाठी मदत करते. शाश्वत विकास आणि पर्यावरण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ विकास आणि संपर्क हे या असोसिएनशचे प्रमुख कार्यक्रम आहेत. अमेरिकेतील नॉर्थ पॅरोलिनामधील दूरहॅम येथे मुख्यालय असलेली IZA ही संघटना चीन, युरोप, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका, हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका येथील आपल्या कार्यालयांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर काम करते.

लेखक इंटरनॅशनल झिंक असोसिएशनचे संचालक (हिंदुस्थान) आहेत.