संगमेश्वर देवरुख मार्गावर आरामबस आणि तवेरा कार यांचा भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाची संततधार सुरुच असल्याने निसरड्या झालेल्या रस्त्यावर संगमेश्वर मार्गावरील करंबेळे खाकेवाडी बसथांब्यासमोर तवेरा कार व खाजगी आराम बस यांचा मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तवेरा चालक गंभीर जखमी झाला असून तवेरामधील अन्य काहीजण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी आराम बस मुंबईतून देवरूखकडे येत होती. तर तवेरा कार देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने करंबेळे खाकेवाडी बसथांब्याजवळ आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता कि, तवेरा कारच्या दर्शनी बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तवेरा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती. तर रस्त्याच्या दोन्हीबाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अपघातानंतर देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले .