खूनाच्या प्रयत्नात 4 वर्षांपासून फरारी असलेल्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर खूनी हल्ला करून चार वर्षांपूर्वी फरारी झालेल्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने बेड्या घातल्या आहेत. कमलेश चंद्रकांत मानमोडे (वय – 21) आणि विजय विष्णू हुलगे (वय – 23, दोघेही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण संपत अवचारे , अमोल पिलाणे, प्रदीप गाडे, चेतन शिरोळकर हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी लोणी काळभोर परिसरातील एकावर खूनी हल्ला करून चार वर्षांपासून फरार झालेले आरोपी कदमवाक वस्ती ग्रामपंचायतजवळ येणार असल्याची माहिती अमोल पिलाणे आणि चेतन शिरोळकर यांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कमलेश आणि विजयला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहीवळे, संग्राम शिनगारे, अमोल पिलाणे, चेतन शिरोळकर यांनी केली.