
फ्लिपकार्टने आपला Flipkart Big Saving Days सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यात स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, इलेक्ट्रॉनिक्स एक्सेसरीज आणि गृहपयोगी वस्तूंचा सेल होणार आहे. 25 ते 29 जुलै दरम्यान हा सेल असणार आहे. फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांसाठी एक दिवस आधी म्हणजेच 24 जुलैपासून हा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये Vivo, Motorola, Realme, Poco या कंपनीच्या मोबाईल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट असणार आहे. फ्लिपकार्टच्या Big Saving Days मध्ये 80 टक्के तर टीव्ही आणि इतर वस्तूंवर 75 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.
या सेलमध्ये Realme C20 वर 500 रुपये डिस्काऊंट मिळणार असून हा फोन साडे सहा हजारांना मिळणार आहे. Realme X7 5G वर एक हजार रुपयांची सूट मिळणार असून फ्लिपकार्टवर हा फोन 18 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. Samsung चा Galaxy F62 ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. पण त्याची किंमत अजून कळालेली नाही.
या सेलमध्ये iPhone चे तीन मॉडेल मिळणार आहे. त्यातही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे. iPhone SE (2020) ची किंमत 39,900 असून तो फ्लिपकार्टवर 28,999 रुपयांना मिळणार आहे., iPhone XR ची किंमत 47,900 असून तो सेलमध्ये 37,999 रुपयांना मिळणार आहे. तर iPhone 12 ची किंमत 79,900 असून तो फ्लिकपाकार्टवर 67,999 रुपयांना मिळणार आहे.
इतकेच नाही तर सेलमध्ये लॅपटॉप, हेडफोन्स, स्पीकर्स, टॅब्लेट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे. तर टीव्हींना 65 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यासह एसी, वॉशिंग मशीन, वॉटर पुरिफायर सारख्या उपकरणांवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे.





























































