
अदानी ट्रान्समिशन लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) दोन अब्ज अमेरिकन डॉलरच्या मध्यम मुदतीच्या कर्जरोख्यांची विक्री जाहीर केली आहे. ग्लोबल मीडियम टर्म नोट्स विक्री आणि पर्यावरण रक्षण संलग्न कर्जरोखे हा एईएमएलच्या भांडवल व्यवस्थापन योजनेचा भाग आहे. यापैकी 30 कोटी डॉलरच्या पहिल्या हप्त्याची प्रक्रिया आज एईएमएलने पूर्ण केली आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या या कर्जरोख्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या हप्त्याच्या रकमेच्या 9.2 पट रकमेचे देकार आले आहेत. यातील 49 टक्के संस्था आशिया खंडातील असून 27 टक्के संस्था युरोप, मध्यपूर्व आफ्रिका खंडातील, तर 24 टक्के उत्तर अमेरिका खंडातील आहेत. देशाच्या ऊर्जा क्षेत्रात पर्यावरण रक्षण संलग्न कर्जरोख्यांची विक्री करणारी एईएमएल ही पहिली कंपनी ठरली आहे.

























































