जम्मू कश्मीरमध्ये ढगफुटी; 5 जणांचा मृत्यू, 40 जण बेपता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आसून 40 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत दहा घरांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि जम्मू कश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य आणि बचाव कार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नेटवर्कची समस्या असून संपर्क साधण्यास अडचण येत आहे. संपूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट झारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


या नैसर्गिक आपत्तीत 40 जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बचाव कार्यासाठी प्रशासनाच्या वेगवेगळ्या टीम घटनास्थळी धाव घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात पाऊस, दरडी कोसळण्या सारख्या नैसर्गिक आपत्तीत येत आहेत.त यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. किश्तवाड जम्मू पासून 200 किमी दूर आहे. किश्तवाड डोंगरी भाग असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.