केवळ विवाहासाठी धर्मपरिवर्तन चुकीचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ विवाहासाठी धर्मपरिवर्तन केले जात असल्याबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. अकबर आणि जोधाबाईने धर्मपरिवर्तन न करता विवाह केला. एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचाही आदर केला, असे नमूद करीत न्यायालय म्हणाले, ‘केवळ विवाहासाठी धर्मपरिवर्तन केले तर त्यात धर्माबद्दल विशेष आस्था नसते. हा निर्णय केवळ दबाव, भीती व लालसेपोटी घेतला जातो. अशा प्रकारच्या धर्मपरिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते आणि विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन मिळते. उत्तर प्रदेशातील लव जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाची ही टिपणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.