
जम्मू कश्मीरमध्ये एका मशीदीजवळ स्फोट झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू कश्मीरचे वादग्रस्त कलम 370 हटवण्यात आले होते. आजच हा स्फोट झाल्याने घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास श्रीनगरच्या नौहट्टा भागातील जामिया मशीदीजवळ एक स्फोट झाला. या स्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कलम 370 हटवण्यात आले होते. याच दिवशी स्फोट झाल्याने सुरक्षा दलाने संशय व्यक्त केला असून त्यानुसार तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी कुपवाडा जिल्ह्यात एक स्फोट झाला होता. त्यात 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. तरुणी आपल्या आई सोबत भाजी आणण्य़ासाठी गेली होती तेव्हा स्फोट झाला. या स्फोटात तरुणीची आई गंभीर जखमी झाली होती.



























































