दारुच्या नशेत मुलांनी वृद्ध आईला केली बेदम मारहाण, कपडेही फाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारुच्या नशेत दोन नराधमांनी त्यांच्या आईला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमधील आगर मालव या ठिकाणी ही घटना घडली असून पोलिसांनी त्या दोघा नराधमांना अटक केली आहे. या घटनेत त्यांची 80 वर्षीय आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर महिला तिच्या दोन मुलांसह राजना गावात राहते. तिच्या दोन्ही मुलांना दारुचे व्यसन आहे. ते दोघेही कायम दारुच्या नशेत तर्राट असतात. सोमवारी या दोन्ही मुलांनी दारुसाठी आईकडे पैसे मागितले. त्यावेळी त्या महिलेने मुलांना पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या मुलांनी आईला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर ते तिला खेचत घराबाहेर घेऊन आले. या मारहाणीत महिलेच्या अंगावरचे कपडेही फाडले.

या प्रकरणी शेजारच्यांनी मध्यस्थी करत त्या महिलेला मुलांच्या तावडीतून सोडवले. तोपर्यंत कुणीतरी पोलिसांनाही सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.