
जगप्रसिद्ध लॉर्डस मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानचा पहिला डाव 364 धावांमध्ये आटोपला. दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने 37 आणि रवींद्र जाडेजाने 40 धावांचे योगदान दिले, तर के.एल. राहुल 129 धावांमध्ये बाद झाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन याने सर्वाधिक पाच बळी घेतले. ओली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी 2, तर मोईन अलीला एक बळी मिळाला.
Innings Break!
Jadeja (40) is the last one to depart as #TeamIndia are all out for 364 runs.
Scorecard – https://t.co/KGM2YEualG #ENGvIND pic.twitter.com/hOWcJNlGKu
— BCCI (@BCCI) August 13, 2021
तत्पूर्वी टीम इंडियाने आपला पहिला डाव कालच्या तीन बाद 276 धावांवरून पुढे सुरू केला. पहिल्याच षटकात काल नाबाद शतकी खेळी करणारा के.एल. राहुल बाद झाला. रॉबिन्सनने त्याला 129 धावांवर बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणे देखील 1 धाव काढून माघारी परतला.
Photo – लॉर्डसवरील हिंदुस्थानचे ‘शतक’वीर, यादीत गोलंदाजाचे नाव वाचून व्हाल अवाक
दोन खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांची जोडी जमली, दोघांनी 49 धावांची भागिदारी केली. लंचपूर्वी पंत 37 धावांवर बाद झाला. यानंतर शमी, इशांत, बुमराह हे देखील झटपट बाद झाले. अखेरची विकेट जाडेजाची गेली, त्याने 40 धावा केल्या.




























































