
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात नुकताच लॉर्डस मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला गेला. या लढतीत अखेरच्या दिवशी टीम इंडियाने यजमान संघाला बाद करत 151 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात के.एल. राहुलने दमदार शतक ठोकले तर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने 83 धावांची खेळी केली. याचा फायदा दोघांनाही आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये झाला आहे.
आयसीसीने बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ताज्या क्रमवारीमध्ये लॉर्डस कसोटीत नाबाद शतक ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो दुसऱ्या क्रमांवार पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 901 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
‘याद राखा, एकाला डिवचाल तर आम्ही 11 जण…’, राहुलचा इंग्लंडला खणखणीत इशारा
पहिल्या 10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे 3 फलंदाज आहेत. कर्णधार विराट कोहली 776 गुणांसह पाचव्या, रोहित शरमा 773 गुणांसह सहाव्या आणि रिषभ पंत 736 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. के.एल. राहुलनेही 20 स्थानांची उडी घेतली असून तो 37 व्या स्थानावर पोहोचला आहे.
↗️ Joe Root rises to No.2
↗️ Babar Azam moves up two spotsThe latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings for batting
https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/ERYzCGm9Pc
— ICC (@ICC) August 18, 2021
रोहितची विक्रमी कामगिरी
एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये छाप पाडलेला रोहित शर्मा सुरुवातीच्या काळात कसोटीमध्ये फ्लॉप गेला होता. मधल्या फळीत फलंदाजीला येणाऱ्या रोहितला दोन वर्षापूर्वी सलामीला येण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. दोन वर्षापूर्वी 54 व्या स्थानावर असणारा रोहित आता कसोटी क्रमवारी सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीमध्ये रोहितने 36, नाबाद 12, 83 आणि 21 अशी खेळी केली आहे.
सचिन, कोहली, पॉन्टिंगला जे जमलं नाही ते शमीने करुन दाखवलं, लॉर्डसवर केली ऐतिहासिक कामगिरी
अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम
गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पहिल्या दोन कसोटीमध्ये संधी न मिळालेल्या अश्विनला तिसऱ्या कसोटीमध्ये मैदानात उतरण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विनसह जसप्रीत बुमराह पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये आहे. तसेच लॉर्डस कसोटीत दोन्ही डावात मिळून 8 बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजने 38 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
James Anderson and Jason Holder make significant gains in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings for bowling
https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/sTDH9Rr6In
— ICC (@ICC) August 18, 2021



























































