ड्रग्ज तस्करीसह विविध गुन्हे करून वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहणाऱया एका सराईत गुन्हेगारास एटीएसच्या जुहू युनिटने दिल्लीत जाऊन पकडले. निरंजन शहा असे त्याचे नाव असून तो पूर्वी शेअर मार्पेट घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षद मेहताचा साथीदार होता.
एटीएसच्या जुहू युनिटने मार्च महिन्यात सोहेल मेमन याला पाच किलो 65 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले होते. अडीच कोटीचे हे ड्रग्ज साथीदार निरंजन शहा याच्याकडून घेतल्याचे सोहेलने चौकशीत सांगितले. त्यामुळे जुहू युनिटने निरंजन शहाला रडारवर घेत त्याचा शोध सुरू केला. सोहेल हा ओळख बदलून वेगवेगळ्या राज्यात, शहरांमध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली. अतिशय चाणाक्ष असलेला निरंजन कुणालाही आपला थांगपत्ता लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होता. मात्र असे असतानाही उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ, एपीआय सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर व पथकाने काwशल्याने तपास केला असता निरंजन हा वेगळी वेशभूषा व नाव बदलून दिल्लीतील मुनेरका गाव येथे भाडय़ाची खोली घेऊन राहत असल्याचे शोधून काढले. त्यानंतर गरीब असल्याचा आव आणून दिल्लीत लपलेल्या निरंजन शहाला एटीएसने पकडून आणले.


























































