मध्य रेल्वेच्या स्थानकांना आयएसओ प्रमाणपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निकषांद्वारे ‘आयएसओ-14001ः2015’ प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि स्टेशन स्वच्छ राखणे तसेच पर्यावरण टिकविण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

हिंदुस्थानी रेल्वेवर 720 इको-स्मार्ट स्थानके आहेत. रोजची प्रवाशांची संख्या आणि स्थानकांचे उत्पन्न आधारित त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यात मध्य रेल्वेची 77 स्थानके इको- स्मार्ट स्थानके आहेत. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील 77 इको-स्मार्ट स्थानकांना ‘आयएसओ-14001ः2015’ प्रमाणपत्र मिळाले आहे. तर मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमधील 46 स्थानकांना हे प्रमाणपत्र मिळाले असून इतर झोनच्या कोणत्याही डिव्हिजनमधील निवड झालेल्या स्थानकांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई डिव्हिजनच्या 37 इको स्मार्ट स्थानकांना नव्याने आयएसओ-14001ः2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.