2 लाख 29 हजार 141 लसवंत प्रवाशांनी काढले पास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास खुला झाला असून अशा लसीकरण पूर्ण होऊन पात्र ठरलेल्या नव्या प्रवाशांची संख्या आता 2 लाख 29 हजार 141 इतकी झाली आहे. त्यामुळे आता उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱया प्रवाशांची एकूण संख्या 33 ते 35 लाख इतकी झाली आहे.

11 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत पश्चिम रेल्वेवर लसीकरण पूर्ण झालेल्या 71,020 जणांनी पास काढले तर मध्य रेल्वेवर 1 लाख 58 हजार 121 जणांनी पास काढले. अशा एकूण पास काढलेल्यांची संख्या आता 2 लाख 29 हजार 141 इतकी झाल्याची आकडेवारी सांगत आहे. सर्वाधिक पास काढणाऱयांमध्ये बोरिवली आणि डोंबिवलीकरांनी आघाडी कायम राखली आहे.