
मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीचे क्लाऊड मायग्रेशन (Cloud Migration) चे काम पूर्ण झाले आहे. क्लाऊड मायग्रेशन नंतरच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मालमत्ता कर प्रणाली बुधवार (दि. 25 ऑगस्ट 2021) रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. गुरुवारी (दि. 26 ऑगस्ट 2021) पासून ही प्रणाली पुन्हा कार्यान्वित होणार आहे.
मालमत्ता कर प्रणाली बंद असल्याच्या कालावधीत प्रशासकीय विभागातील नागरी सुविधा केंद्र तसेच एनईएफटी (NEFT) व्यतिरिक्त इतर ऑनलाईन अधिदान (Online Payment) इत्यादी सुविधा उपलब्ध राहणार नाहीत. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.



























































