
आपण स्लिम असावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. पेनिसिल्व्हानियातील बोब्बी ही तरुणी मात्र याला अपवाद आहे. तिचे वजन तब्बल 242 किलो असून जगातील सर्वात वजनदार व्यक्ती व्हायचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी दररोज ती भरपूर प्रमाणात भोजन करतेय.
लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते त्यामुळे बहुतेकजण आपले वजन कमी करण्यासाठी डाएट, जिमसारखे पर्याय निवडतात. बोब्बीच्या बाबतीत मात्र उलटच आहे. सध्या तिची पंबर 95 इंच असून 99 इंचापर्यंत वाढवण्यासाठी ती सातत्याने काही ना काही खातच असते. जंकफूडला ती अधिक पसंती देते. सर्वाधिक वजनाच्या व्यक्तीचा विक्रम आपण लवकरात लवकर मोडू असा तिला विश्वास आहे. वजन असेच वाढत राहिले तर जिवावर बेतू शकते असा इशारा डॉक्टरांनी तिला दिला आहे. तरीदेखील बोब्बीला त्याची फिकीर नाही. लठ्ठपणा हीच आपली ओळख असल्याचे ती सांगते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.



























































