
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत वेगाने चढउतार होत आहेत. शनिवारी देशभरात 45 हजार 83 रुग्णांची नोंद झाली तर 460 बाधितांना प्राण गमवावे लागले. कोरोनायोद्धय़ांची संख्या वाढत असली तरी सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर गेल्याने देशात तिसऱया लाटेची घंटा वाजतेय असा सावधानतेचा इशारा तज्ञांनी दिला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 45 हजार 083 नव्या कोरोनाबाधितांची, तर 460 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 63 कोटी 09 लाख 17 हजार 927 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी 4 हजार 455 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 62 लाख 59 हजार 906 कर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.02 कर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मृत्युदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 530 व्यक्ती होम क्कारंटाइन असून 2 हजार 357 व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाइनमध्ये आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
देशात आढळलेल्या 45 हजार 83 पैकी सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहेत. केरळमध्ये 31 हजार 265 बाधित आढळले असून 153 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात 4,831 रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या काही घटण्याचे नाव घेत आही. शनिवारी राज्यात 4,831 रुग्ण आढळले तर 126 बाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर बाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273, तर 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.



























































