
गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाने पंतनगर व अंधेरी डीएन नगर येथील दूधभेसळीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. पहाटेच्या सुमारास नामांकित दुधामध्ये पाणी मिक्स करताना पाच भेसळखोर रंगेहाथ सापडले.
पंतनगर येथील गोकुळनगरात नामांकित दुधामध्ये भेसळ केली जात असल्याची खबर युनिट 7च्या एपीआय सुनयना सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर, एपीआय सोनावणे व पथकाने पहाटे त्या ठिकाणी छापा टाकला असता 619 लिटर भेसळयुक्त दूध सापडले.
दरम्यान, आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील व पथकाने डीएन नगर येथील एका घरावर पहाटेच्या वेळी छापा टाकला. त्यावेळी एक इसम दुधाची भेसळ करत असताना सापडला. घटनास्थळावरून पोलिसांनी 28 हजार रुपये किंमतीचे भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले.






























































