मुंबईत पिस्तूल, काडतुसे विकायला आलेले अटकेत, राजस्थानचे दोन युवक ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशीरपणे शस्त्रात्र विकणारे दोघे दादर येथे येणार असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने त्या दोघांना सापळा रचून पकडले. त्या दोघांकडे सात देशी बनावटीची पिस्तुले आणि 15 जिवंत काडतुसे सापडली. इंदौर येथून ती शस्त्रs त्यांनी मुंबईत विकायला आणली होती.

गुपचूप मुंबईत शस्त्रs आणून ती विक्री करणारे दोन इसम दादर पूर्वेकडील पीतम हॉटेलजवळ येणार असल्याची खबर खंडणीविरोधी पथकाचे एपीआय सुनील पवार यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, एपीआय सुनील पवार, जालिंदर लेम्बे, अरुण थोरात तसेच डुबल, धादवळ, रोहन सुर्वे, संतोष सुर्वे या पथकाने दादर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान, दादर उड्डाणपुलाकडून दादरच्या दिशेने दोन तरुण लगबगीने जात असताना खबऱयाने त्यांच्याकडे इशारा करताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सात देशी बनावटीची पिस्तुले आणि 15 जिवंत काडतुसे सापडली. मनोजकुमार वैष्णव 27 आणि करण दास (21) अशी दोघांची नावे असून ते मूळचे राजस्थानचे आहेत. इंदौर येथून शस्त्रs घेऊन ती मुंबईत विकण्यासाठी दोघे आले होते.