चाकरमानी निघाले, रेल्वे, एसटी फुल्ल, खासगी बसेसनाही गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अगदी तोंडावर आलेल्या गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू असताना चाकरमान्यांची कोकणाच्या दिशेने जाण्यास आजपासून खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या स्वागताला गावात जरा सणाच्या चार दिवस आधी पोहचून रंगरंगोटीसह इतर तयारी करण्यासाठी चाकरमानी लवकर पोहचत असतात.

यंदा रेल्वेने कोकण मार्गावर चाकरमान्यांसाठी तब्बल 213 गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या आहेत. त्या पश्चिम रेल्वेच्या सुमारे 40 तर उर्वरित फेऱया मध्य रेल्वे चालविणार आहे. याशिवाय एसटीने 2,200 जादा फेऱया सोडल्या आहेत. गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी असल्याने 7 ते 9 सप्टेंबरची रेल्वेची सर्व तिकिटे फुल्ल झाली आहेत. खासगी गाडय़ांनी मनमानी भाडे वाढवू नये म्हणून परिवहन विभागानेही आदेश जारी केले आहेत.

एसटीच्या सुमारे 2300 गाडय़ांचे आरक्षण फुल

z एसटी महामंडळाच्या 3 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार जातानाचे 881 ग्रुप आरक्षण, 908 पूर्ण आरक्षण तर 352 अंशतŠ आरक्षण अशा एकूण 2114 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे. 4 आणि 5 तारखेचे मिळून एकूण सुमारे 2300 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे. तर येतानाच्या परतीच्या 1323 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे.