‘मराठीच्या भल्यासाठी’ समितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी काैतिकराव ठाले-पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी ही सर्वार्थाने सर्वदूर पसरलेल्या तमाम लोकांच्या दैनंदिन व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी सरकारने ‘मराठी भाषाविकास प्राधिकरणा’चा कायदा करून संस्थेस अर्धन्यायिक दर्जा द्यावा, तसेच सरकारने मान्य केलेले ‘मराठी विद्यापीठ’ पुढील शैक्षणिक वर्षी सुरू करावे, अशा मागण्या ‘मराठीच्या भल्यासाठी’ या 24 मराठी संस्थांच्या शिखर संस्थेने बुधवारी पत्रकार परिषदेत केल्या.

राज्यातील सर्व भागांतील साहित्य व कला संस्था, तसेच मान्यवर व्यक्तींना सहभागी करून या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘माधवराव पटवर्धन सभागृहा’त पार पडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समितीचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काwतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्ष म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. समितीच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख, उपाध्यक्षपदी प्रा. मिलिंद जोशी, प्रा. उषा तांबे, डॉ. दादा गोरे, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. अशोक ठाकूर, विजय चोरमारे आणि रेखा नार्वेकर यांचीही निवड झाली. पत्रकार परिषदेला मधू मंगेश कर्णिक, काwतिकराव ठाले-पाटील, प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.