Ind Vs Eng Test Match – पाचव्या कसोटीवर अनिश्चिततेचे ढग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंडदरम्यान उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱया पाचव्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहे. ‘टीम इंडिया’च्या सपोर्ट स्टाफमधील ज्युनियर फिजियो रोगेश परमारला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली असून या टेस्टच्या अहवालावर उद्यापासून सुरू होणाऱया कसोटी सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले, हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान उद्यापासून कसोटी सामना सुरू होईल की नाही हे या घडीला सांगता येणार नाही, मात्र तरीही कसोटी होईल अशी आशा वाटते.

…तर कसोटी सामना रद्द होणार

‘टीम इंडिया’च्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य योगेश परमारला कोरोनाची लागण झाल्याने मँचेस्टरमध्ये गुरुवारे होणारे हिंदुस्थानी संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमधील आपापल्या रूममधून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एखाद्या क्रिकेटपटूची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पाचवा कसोटी सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे.