हवेली पोलीस ठाण्याच्या सहायक फौजदारासह पोलीस नाईकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघाताच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदारकडून 10 हजारांची लाच घेणाऱ्या हवेली पोलीस ठाण्यातील सहायक सहायक फौजदारासह पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक फौजदार श्रीपती माणिक कोलते (वय 55) आणि पोलीस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34) अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. तक्रारदार यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्हयामध्ये तपासात आवश्यक मदत करण्यासाठी कोलते यांनी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. जगताप यांनी 10 हजारांची लाच स्वीकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.