‘साकीनाका’ प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर, फक्त 18 दिवसांत चार्जशीट दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथील बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी फास्ट ट्रकने पूर्ण केला आहे. आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून 346 पानांची ही चार्जशीट आहे.

10 सप्टेंबर रोजी साकीनाका येथे मूळचा यूपीचा असलेल्या मोहन चौहान (45) या नराधमाने नशेत असताना त्याच्या ओळखीच्या महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार केला. एवढे करून न थांबता त्याने अत्यंत निर्दयीपणे महिलेची हत्या केली. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

  • प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी डीएन नगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती.
  • या पथकाने फास्ट ट्रकवर तपास करीत आरोपीविरुद्ध पुरावे जमा केले. तसेच 77 साक्षीदारांचे जबाब नोंदवत केवळ 18 दिवसांच्या आत तपास पूर्ण केला.