
स्वस्तात परदेशी चलन देण्याच्या आमिषाने चोरट्याने तरूणाला रूमालात गुंडाळलेली साबणाची वडी देउन 3 लाख 35 हजारांची फसवणूक केल्याची घटना वाघोलीसह येरवड्यात घडली आहे. यापुर्वी बिबवेवाडीत एका तरूणाला अशाचपद्धतीने गंडा घातल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तरूणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली परिसरात तरूणाला दोघेजण भेटले होते. त्यांनी गप्पा मारून तरूणासोबत ओळख वाढविली. त्यानंतर स्वस्तात परदेशी चलन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी चोरट्यांनी तरूणाला पुन्हा येरवडा भागात भेटण्यास बोलावले. परदेशी चलन देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून 3 लाख 35 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला कागदात गुंडाळलेली साबणाची वडी देत फसवणूक केली. काही वेळानंतर तरूणाने कागद उघडल्यानंतर त्याला साबणाची वडी आढळून आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ तपास करत आहेत.

























































