मुंबई व पुण्यात प्रॅक्टो केअर सर्जरी सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रॅक्टोने मुंबई व पुण्यात प्रॅक्टो केअर सर्जरी ही आरोग्य सेवा सादर केली आहे. या सेवेच्या सरुवातीमुळे प्रॅक्टोची दुय्यम स्तरावरील आरोग्यसेवा क्षेत्रात प्रदार्पण केले आहे. मुंबई व पुण्यासह बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, अहमदाबाद येथे ही आरोग्य सेवा उपलब्ध आहे. सद्य स्थितीत प्रॅक्टो केअर सर्जरी बरोबर दोनशेहून अधिक शल्यचिकीत्सक जोडले गेले आहेत. आता जनरल सर्जरी, यूरोलॉजी आणि ईएनटी या तीन विभागामध्ये 50 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करण्यात रुग्णांना ही सेवा मद्दत करेल.

कंपनीचा मानस हा या सेवेची व्यापती ही आणखीन तीसहून अधिक शहरांमध्ये विस्तारित करण्याची व तीनशे पेक्षा अधिक केंद्रे सुरू करण्याच्या आहे. तसेच अधिक स्पेशलिटी ही या सेवात जोडण्याचा आहे. तसेच या सेवेत रुग्णांना लॉजिस्टिक्सची तयारी, प्री-सर्जिकल फिटनेस, इमेजिंग, क्रॉस-रेफरल, ओटी बुकिंग, आर्थिक मंजुरी, क्लिअरन्स, विमा मंजुरी, ते डिस्चार्जच्या औपचारिकता याकरिता एक समर्पित सहाय्यक मिळणार आहे. शिवाय ही आरोग्य सेवा लवचिक पेमेंट पर्यायां, नॉन-कॉस्ट ईएमआय पर्याय, सवलतीची औषधे आणि प्रयोगशाळा चाचण्या या ही सुविधा पुरवणार आहे. जोडीला प्रॅक्टो केअर सर्जरीमुळे रुग्णांना त्यांच्या गरजांशी जुळणारी व त्यांना सहज उपलब्ध होणारी रुग्णालयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.