
भविष्यातही शिवसेना, काँग्रेससोबत आपल्याला काम करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त निफाड येथे ते बोलत होते. विधानसभेत 54 जागा मिळाल्या म्हणजे आभाळाला हात लागले नाहीत. पक्षवाढीसाठी पक्षाची ध्येयधोरणे समाजात रूजवावी लागतात. कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहावे, असेही ते म्हणाले. मागीलवेळी काँग्रेस हा मोठा भाऊ होता, आता आपण मोठा भाऊ आहोत. आघाडीत लहान-मोठा असं काही नसतं. सर्वांना एकमेकांच्या सोबतीने काम करायचे आहे. भविष्यात शिवसेना, काँग्रेसबरोबर काम करायचे आहे. येणाऱया काळात महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































