WhatsAppवर मिळणार कॅशबॅक! कसा? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप सध्या वेगवेगळे फीचर्स आणत आहे. त्यात काही काळापूर्वीच पेमेंट सिस्टिमचाही समावेश करण्यात आला आहे.

आता याच सिस्टिमची पुढे जाण्याच्या बेतात व्हॉट्सअॅप आहे. पेमेंट हा पर्याय निवडून त्यातून पैसे पाठवल्यानंतर कॅशबॅक देण्याची यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅपचे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfoने ही माहिती दिली आहे. पेमेंटसोबत कॅशबॅक फीचरही वापरकर्त्यांना देण्यात येणार आहे. त्याबाबत व्हॉट्सअॅपकडून सूचना देण्यात येईल.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेमेंटची देवाणघेवाण केल्यानंतर 48 तासांत मिळालेला कॅशबॅक अकाउंटमध्ये जमा केला जाईल. सध्या हिंदुस्थानात युपीआय पेमेंटवरच हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसंच, हा कॅशबॅक सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याने 10 रुपयांपर्यंत असेल. अद्याप याबाबतच्या अन्य अटीशर्ती काय असतील याची सूचना देण्यात आलेली नाही.

हे फीचर अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअॅपच्या Beta 2.21.20.3 या व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल तर iOSसाठी Beta 2.21.190.15 या व्हर्जनमध्ये उपलब्ध होणार आहे.