भाजप नेत्याच्या सुनेचा कास्टिंग काऊच विषयी खुलासा! काय म्हणाली? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कास्टिंग काऊच हे चंदेरी दुनियेतलं एक काळं सत्य आहे. अनेक तरुणी ग्लॅमरच्या नादाने कास्टिंग काऊचला बळी पडतात. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी आजवर त्यांचे कास्टिंग काऊचचे अनुभव शेअर केले आहेत.

या यादीत असंही एक नाव आहे, जी एका प्रसिद्ध नेत्याची सून आहे. सध्या ही अभिनेत्री अनुपमा या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत काव्या नावाची व्यक्तिरेखा ती साकारत आहे.

या अभिनेत्रीचं नाव मदालसा शर्मा आहे. मदालसाने नुकताच कास्टिंग काऊचविषयी एक खुलासा केला आहे. एका संकेतस्थळाशी बोलताना मदालसा म्हणाली की, आजच्या जगात मुलगा किंवा मुलगी असणं हे सारखंच धोकादायक आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट जगात वावरत असाल तर तिथे एका तरुणीच्या मागे अनेक पुरुष असतात.

पण, या लोकांचा तुमच्यावर किती प्रभाव पडतोय, ते ठरवणं तुमच्या हातात असतं. माझ्याही बाबतीत असे कटू अनुभव आले आहेत. पण, मी यातून स्वतःला योग्य वेळी बाहेर काढू शकले. जर एखाद्या मीटिंगमध्ये कुणी माझ्याशी चुकीचं वागत असेल तर मी तिथून निघून जाते आणि असं करण्यापासून कुणीही मला थांबवू शकत नाही, असं मदालसा यावेळी म्हणाली आहे.

मदालसा शर्मा ही ज्येष्ठ अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. तिचा नवरा महाक्षय चक्रवर्ती हा देखील अभिनेता आहे.