नामसाधनेतील अध्यात्म आणि विज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> एस. एन. सावंत

हिंदुस्थानी तत्त्वज्ञानामध्ये ‘नाम’ या शब्दाला एक विशिष्ट स्थान आहे. ईश्वर किंवा सद्गुरूंचे नाम म्हणजे साक्षात एक कल्पवृक्ष होय. नाम म्हणजे एक श्रेष्ठ भवतारण नौका आहे. ‘नाम साधन पैं सोपे’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच 11 जुलै या दिवशी प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झाले. प्रथितयश विवेचक परमपूज्य सद्गुरू ब्रह्मलीन श्री बापट गुरुजी यांनी नामसाधनेतील तत्त्वज्ञान आणि विज्ञानाधिष्ठत विविध पैलू उलगडताना जी विविध विवेचने केली ती प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहेत. अगदी सामान्यांना समजतील अशी दैनंदिन जीवनातली सोपी उदाहरणे, उद्बोधक गोष्टी, प्रवाही मांडणी या वैशिष्ट्यांमुळे पुस्तक संग्राह्य झाले आहे. ग्रंथाची मांडणी छोट्या छोट्या लेख स्वरूपात आहे, जेणेकरून दैनंदिन लेख वाचनातूनही सामान्य साधकाला नाम-मार्ग चालत राहण्यास, नाम-अनुसंधान ठेवण्यास प्रेरणा मिळत राहील. शुद्ध चित्ताने, अहंकार विरहित, सत्कर्मरत राहून केलेली ही साधी सरळ नाम साधना, मनुष्याचे मन बळकट करून त्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे नेण्याकरिता निश्चितच उपयुक्त ठरेल. हे पुस्तक www.bookganga.com या संकेतस्थळावर आणि इतर पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. इच्छुक वाचक-साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

नाम साधन पैं सोपे

लेखक : परमपूज्य सद्गुरू ब्रह्मलीन श्री बापट गुरुजी

प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन, बदलापूर

पृष्ठ : 260, मूल्य : रुपये 280/-