
कोकण आपलोच आसा, आता विमानान येवा!… तब्बल 22 वर्षांनंतर सिंधुदुर्गवासीयांचे हक्काच्या विमानतळाचे स्वप्न आज साकार झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका शानदार कार्यक्रमात वेंगुर्ले येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन तर केलेच, पण सिंधुदुर्गाहून मुंबईला जाणाऱया विमानालाही ‘शुभास्ते पंथानु’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे या सोहळय़ाला उपस्थित होते खरे, पण त्यांच्या ‘फुशारकी’चे विमान विमानतळावरच क्रॅश झाल्याचे अवघ्या जगाने पाहिले.
या सोहळय़ाला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी आपल्या दिल्लीतील कार्यालयातूनच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला आणि तोसुद्धा मराठीतून! त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य यांचे खास अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, ज्योतिरादित्य तुम्ही इतकं लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरलात नाही. माती एक संस्कार असतो. मातेचा एक संस्कार असतो आणि मातेच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. या मातीत अनेक झाडे उगवतात. त्यात काही बाभळीची असतात, काही आंब्याची असतात. आता बाभळीची झाडे उगवली तर माती म्हणणार, मी काय करू?… जोपासावे लागते! विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे आणू नयेत. आपापसात नाही, तर देशाच्या शत्रूवर तलवार चालली पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
एवढी खर्डेघाशी का करावी लागली?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, पर्यटन… पर्यटन… पर्यटन… कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणून अनेकजण सांगून गेले. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असे कोकण मी उभे करेन. म्हणूनच आज आमच्या सरकारने पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे. चिपीचे हे विमानतळ सुरू होण्यासाठी एवढी वर्षे का लागली? एवढी खर्डेघाशी, भांडीघाशी का करावी लागली? आमचे सरकार आल्यावरच हे विमानतळ कसे मार्गी लागले? असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारले.
सोमवारी गडकरींसोबत बैठक
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत रस्त्याच्या विषयावर बैठक आहे. आजपर्यंतचे रस्त्यावरचे आणि काही कारभाराचे खड्डे पडले असतील तर ते आपण एकत्रपणे बुजविण्याचे काम करणार नसू तर आपल्याला निवडून देणाऱया लोकांचे दुर्भाग्य असेल. खड्डय़ात गेली लोकशाही, असे म्हणण्याची वेळ येउै द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
या सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निरंजन डावखरे, वैभव नाईक, नितेश राणे, खासदार आरविंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अन्बवपन आदी उपस्थित होते.
पेढय़ातील गोडवा दाखवावा लागतो
z मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. कोकणसाठी आपण काय काय केले याचा ‘इतिहास’ नारायण राणे यांनी उगाळला होता. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले, कोणी काय केले, कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या विषयावर सविस्तर बोलता येईल. मी आता बोलणार नाही. पण विकासामध्ये मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला तेव्हा दुसऱया क्षणाला मी फाईलवर सही केली. पेढय़ातला गोडवा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. खासदार विनायक राऊत यांनी विमानात दिलेल्या पेढय़ाचा उल्लेख राणे यांनी आपल्या भाषणात केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतला.
कोकणची जनता डोळे मिटून राहत नाही
z सिंधुदुर्गात केलेल्या विकासकामांची टिमकी वाजवणाऱया नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, नारायणराव आपण म्हणता ते खरं आहे. तुम्ही जी विकासकामं केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल, असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे.
सिंधुदुर्गात हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हावी
z कोकणचे जे वैभव आहे, संपन्नता आहे ती आज जगासमोर येत आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोकणातील सुंदर किनारे, किल्ले हे न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्गात हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हायला हवी. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी ज्योतिरादित्य यांनी मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
विकासासाठी ‘अलायन्स’
z या सोहळय़ाला सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, या ठिकाणी महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख पक्षांचे, राजकीय पक्षांचे नेते उपस्थित आहेत हा ‘अलायन्स’ आहे. म्हणूनच चिपी विमानतळावर ‘अलायन्स’ची विमानसेवा सुरू झाली आहे. हा ‘अलायन्स’ विकासासाठी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
n सिंधुदुर्ग विमानतळावर पहिले विमान 12.52 वाजता दाखल झाले. या विमानातील प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या विमानातून उद्योग मंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत परिवहन मंत्री अनिल परब, कृषी मंत्री दादा भुसे, आदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले.
n नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी यँव बोलणार, त्याँव बोलणार अशा फुशारक्या मारल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या भाषणात कधी राणे यांना शालजोडीतील हाणत, तर कधी थेट त्यांचे नाव घेत टोले हाणले आणि राणेंच्या भिरभिरणाऱया विमानाचे टायरच पंक्चर केले.
आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, आजचा दिवस, आजचा सण हा आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा मोठय़ा सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला नको. शिवसेनाप्रमुखांचे मस्तक कुठेही झुकले नाही, पण कोकणच्या या भूमीत नतमस्तक झाले आहे.
कोकणचे सौंदर्य जगाला खुले – आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, चिपी विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना वरून कोकणचा नितांत सुंदर समुद्रकिनारा, पांढरीशुभ्र वाळू, निळेशार पाणी, हिरवे डोंगर, कोकणच्या लाल मातीचे दर्शन होते. हे सर्व आजपासून आपण सर्व जगाला दाखवू शकू. विमानतळाच्या उद्घाटनानंतर आपण कोकणचे दरवाजे जगाला खुले केले आहेत. जगाच्या प्रत्येक कोपऱयातून या ठिकाणी पर्यटक कसे येतील याची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत.
सी वर्ल्डवर लक्ष केंद्रित
z रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांत जगभऱातून पर्यटक आणायचे असतील तर जिह्यात पंचतारांकित हाँटेल आणण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला दोन फाईव्ह स्टार हॉटेलचा प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतला. पुढील दोन वर्षात चांगली हॉटेल येत आहेत. सी वर्ल्ड, सबमरीन टुरिझमवर आम्ही आता लक्ष पेंद्रित करीत आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोकणात पर्यटन वाढवत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे मराठीत भाषण
z केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संपूर्ण भाषण मराठीत केले. महाराष्ट्र व सिंधुदुर्गाशी आपला रक्ताचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात विमानसेवा व कोकणात रेल्वेचा विचार माझे वडील व पेंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांच्या काळातच सुरू होता. त्यामुळे कोकणच्या भूमीशी आमचे पारंपारिक नाते आहे. त्यामुळे आज या विमानतळाचे उद्घाटन होत असल्याचा मला आनंद होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महामार्गाच्या अडचणी सोडवणार
z सध्या चिपी विमातळाचा अडीच किमीचा रनवे आहे. या विमानतळाच्या बाजूला मोकळी जागा आहे. हा रन वे साडे तीन किमीचा होऊ शकतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गासाठी येणाऱया अडचणी आम्ही सोडवणार आहोत. गोव्याला जाणारा महामार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांची गैरसोय टळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोलून प्रश्न सोडवू असे पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे असे अजित पवार यांनी नमूद केले. कोकणच्या पर्यटनाच्या बाबतीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे लक्ष आहे. त्यांनी आणलेले प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही मंजूर करतो असेही अजित पवार म्हणाले.
































































