चिपळूण पूररेषेबाबत पावणे तीन हजार तक्रारी – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील पूररेषेच्या विरोधात पावणे तीन हजार नागरिकांनी तक्रारी दिल्याने शासनालाही त्या तक्रारींचा विचार करावा लागणार आहे. ही पूररेषा कायम ठेवल्यास चिपळूण शहरातील ७० टक्के परिसर बाधित होऊ शकतो. त्यामुळे चिपळूण पूररेषा आखणीबाबत मंगळवारी डिबीजे महाविद्यालयात बैठक होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या कामाची सुरूवात झाली असून सध्या प्रयोगिक तत्वावर डांबरीकरण सुरू असून 15 ऑक्टोबर रोजी कोकणनगर येथून डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. मांडवी पर्यटन संस्थेच्या मागणीनंतर क्रुझ टर्मिनलबाबत मुंबईत बैठक झाली. क्रुझ टर्मिनला कुरणवाडीत थांबा दिल्यास रत्नागिरीच्या पर्यटन वाढीला खूप फायदा होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.