मुलाने केली वडिलांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना मंगळवारी दहिसर परिसरात घडली. अण्णाराव बाबुराव बनसोडे असे मृताचे नाव आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी संदीप बनसोडेला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. अण्णाराव हे दहिसर पूर्व येथे पत्नी जयमाला आणि मुलगा संदीप, अमोल यांच्यासोबत राहत होते. मंगळवारी सकाळी अण्णाराव हे दारू पिऊन घरी आले तेव्हा घरी संदीप होता. दारूच्या नशेत असलेल्या अण्णांनी जयमालाला शिवीगाळ करत जाळून टाकण्यासाठी गॅस सुरू केला. तेव्हा संदीपने घरातील टोचा उचलून अण्णाराव यांच्या पाठीत खुपसल्याने त्यांचा मृत्यू झाला.