
यंदाच्या आखातातील टी-20 विश्वचषकात सलामीला पाकिस्तानकडून आपल्याला मोठा पराभव पत्करावा लागला याचे दुःख आहे. पण त्यासाठी निराशा नको. आपला हिंदुस्थानी संघ पराभवातून उसळी घ्याल समर्थ आहे. रविवारची न्यूझीलंडविरुद्धची महत्त्वपूर्ण काढत आपण जिंकली तर टीम इंडिया यंदा नक्कीच टी- 20 विश्वचषक मायदेशी आणू शकेल असा विश्वास माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केला आहे.
सेहवागच्या एका चाहत्याने यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकणार, असा प्रश्न विचारला असता सेहवाग तत्काळ उद्गारला टीम इंडिया. सलामीला हरून अनेकदा टीम इंडियाने स्पर्धा जिंकण्याचा प्रभाव केला आहे. मात्र आता यापुढच्या सर्व लढती हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना जीव ओतून खेळाव्या लागणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची लढत आपल्यासाठी सेमीफायनलच ठरणार आहे. आपण हिंदुस्थानी चाहत्यांनी कठीण घडीला टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहनही त्यांने केले.




























































