
मुंबईत 16 जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 18 वर्षांवरील पात्र 92 लाख 36 हजार लाभार्थ्यांपैकी तब्बल 9115606 जणांनी म्हणजेच 99 टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 5564173 जणांनी म्हणजेच 60 टक्के जणांनी दुसरा डोस घेतल्याने त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईने लसीकरणात देशात आघाडी घेतली आहे.
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर सद्यस्थितीत पालिका, खासगी आणि सरकारी अशा 467 पेंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एपूण 14119732 डोस देण्यात आले आहेत. जानेवारीअखेरपर्यंत सुमारे 92 लाखांहून जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने पालिका काम करीत आहे. ज्यांनी अजूनही पहिला डोस घेता आलेला नाही अशा नागरिकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. खासगी संस्थांना ‘सीएसआर’ फंडातून सोसायटय़ा, झोपडपट्टीत विशेष व्हॅक्सिनेशन पॅम्प घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी आता मोबाईल व्हॅन उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे.
राज्यातील 31 जिह्यांमध्ये शून्य कोरोना मृत्यू
राज्यातील कोरोना आलेख दिवसेंदिवस घसरत चालला असल्याची चिन्हे दिसत आहेत. आज राज्यातील 31 जिह्यांमध्ये कोरोना मृतांचा आकडा शून्य होता. मुंबई, नगर, सातारा, सिंधुदुर्ग, बीड या जिह्यांमध्ये 10 मृतांची नोंद झाली. राज्यात 809 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले तर 1901 रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के झाले आहे. मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
लहान मुलांच्या लसीकरणासाठी सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा
ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने लहान मुलांच्या लसीकरणासाठी अलीकडेच परवानगी दिली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. असे असले तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी कोणत्याही क्षणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेला मिळालेल्या गाईडलाइननुसार मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू आहे.
यामध्ये 15 हून जास्त मुलांना डोस दिले असून सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने लहान मुलांची ट्रायल यशस्वी ठरली आहे. सरकारने गाईडलाइन जाहीर केल्यास दोन ते तीन दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरू करता येईल. यासाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले असून लसीकरण केंद्रांसह पालिका सज्ज असून सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
































































