Daily Horoscope 17 November 2021 – काय आहे आजचं राशिभविष्य ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष – ( ARIES – Tuesday, November 17, 2021)
प्रयत्न करत रहा यश मिळेल. गृहिणींना सिनेमा बघायला निवांत वेळ मिळेल. धनलाभाची शक्यता.
शुभरंग: पिवळा

वृषभ – (TAURUS – Tuesday, November 17, 2021)
आजचा दिवस कुटुंबासोबत घालवाल. जोडीदारासोबत जवळच्या प्रवासाचा बेत आखाल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
शुभरंग : पांढरा

मिथुन – ( GEMINI Tuesday, November 17, 2021)
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. इतरांशी गोड बोला.
शुभरंग: हिरवा

कर्क – (CANCER Tuesday, November 17, 2021)
दात आणि पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सायंकाळी घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवू नका.
शुभरंग: निळा

सिंह – ( LEO Tuesday, November 17, 2021)
अडचणीच्या वेळी शेजारी मदत करतील. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. तुमच्या चांगल्या वर्तणुकीचा इतरांवर परिणाम होईल.
शुभरंग: क्रीम

कन्या – (VIRGO Tuesday, November 17, 2021)
अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. स्वत:साठी वेळ मिळेल. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक होईल. शोभेची वस्तू खरेदी कराल.
शुभरंग: मोरपिसी

तुळ – ( LIBRA Tuesday, November 17, 2021) 
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. ज्येष्ठ व्यक्तिंच्या गाठीभेटीचा योग आहे.
शुभरंग: चॉकलेटी

वृश्चिक – ( SCORPIO Tuesday, November 17, 2021) 
कामाचे व्यवस्थित नियोजन करून कामे पूर्ण करा. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. मानसिक शांतता मिळेल.
शुभरंग: लाल

धनु – ( SAGITTARIUS Tuesday, November 17, 2021) 
दिवस मजेत जाईल. सौंदर्यप्रसाधनांची खरेदी कराल. जुन्या मित्रांशी संवाद साधाल.
शुभरंग: गुलाबी

मकर ( CAPRICORN Tuesday, November 17, 2021) 
जोडीदारासाठी वेळ काढाल. निवांत मिळालेला वेळ आवडत्या कामात घालवता येईल. हुशारीने वागा.
शुभरंग: नारिंगी

कुंभ (AQUARIUS Tuesday, November 17, 2021)
दिवस मजेत जाईल. जुने छंद जोपासाल. चालण्याची सवय लावा. सकारात्मक राहाल.
शुभरंग: केशरी

मीन (PISCES Tuesday, November 17, 2021)
दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय सोडून द्या. एखादे काम शांतपणे, मन लावून करा. कर्ज घेताना विचार करा.
शुभरंग: आकाशी