
इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक दुचाकीबद्दल आपण ऐकलंय. पण इलेक्ट्रिक विमानाबद्दल ऐकलंय का. नाही ना… मग ऐका… रोल्स रॉयस या लक्झरी कार बनवणाऱया कंपनीने इलेक्ट्रिक एयरक्राफ्ट तयार केलंय. या विमानाने तीन किलोमीटर उंचीवर ताशी 555.9 किलोमीटर वेगाचा रेकॉर्ड केलाय. विमान 15 मिनिटे अंतराळात राहिले. विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ इनोव्हेशन’ असे आहे.
‘स्पिरिट ऑफ इनोव्हेशन’ हे एक आसनी एयरक्राफ्ट आहे. यामध्ये सर्वात शक्तिशाली बॅटरी पॅक दिलेला आहे. ते 6 हजार सेल बॅटरी पॅकवर काम करते. त्यामधील इलेक्ट्रिक मोटर सुमारे 500 एचपी पॉवर निर्माण करते. हे विमान ताशी 483 किलोमीटरच्या कमाल वेगाने उडू शकते, असा दावा रोल्स रॉयस कंपनीने केला आहे. ही कंपनी एयर टॅक्सी विकसित करणार आहे.


























































