चंद्रपुरात वनविभागाचे ‘जागते रहो; वाघाच्या बंदोबस्तासाठी अकरा ट्रॅप कॅमेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या काही गावांत वाघाने धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत तीन वाघांचे हल्ले झाले असून त्यात एका महिलेचा बळी गेला, तर दोघे थोडक्यात बचावले. चेक बल्लारपूर, कसरगट्टा, सेलूर आणि नागरेड्डी या गावात तर वाघाचे दर्शन दिवसाढवळ्या होऊ लागले आहे. </span

>

सध्या पोंभुर्णा तालुक्यात कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, वाघाच्या दहशतीत ही सगळी कामे रखडली आहे. वनविभागावरही सध्य वाघाला जेरबंद करण्याबाबत दबाव वाढत चालला आहे. सध्या वनविभागाने या भागात अकरा ट्रॅप कॅमेरे, 46 कर्मचारी तैनात केले आहेत.

पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टी या गावातील बेबीताई हनुमान धोडरे ही महिला कापूस वेचणीसाठी गेली होती. तेव्हाच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने बेबीताई धोडरे यांच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर आपल्या सहकाऱ्याची वाट बघत असलेल्या युवकावर वाघाने झडप घेतली. त्याला जंगलात फरफटत नेले. वेळीच त्याचे मित्र आले. त्यामुळे त्या युवकाचा जीव वाचला.

शुक्रवारी चेक बल्लारपूर शेतशिवारात बकऱ्यावर वाघाने हल्ला चढविला. कळपातील एक बकरी फस्त केली. गुराख्याने तेथून लागलीच पळ काढला. त्यामुळे तोही बचावला. पोंभुर्णा तालुक्यात कापूस, धानाचे पीक घेतले जाते. सध्या कापूस तोडणी आणि धान मळणी सुरू आहे. मात्र, वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांना मजूर नकार देत आहेत. यामुळे कापुस तिथेच पडून आहे. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिगडत आहे. कापसाचे उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.