वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेतून घरी जात असताना वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून पळालेल्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी 24 तासांत बेड्या ठोकल्या. मोहंमद अख्तर उमर शरीफ असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने पोलिसांनी तीन गुह्यांची उकल केली आहे.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या चकाला परिसरात राहतात. गेल्या आठवड्यात त्या बँकेत गेल्या होत्या. बँकेचे काम आटपून त्या घरी जात होत्या. तेव्हा एक जण त्याच्याजवळ आला. त्याने तक्रारदार यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला होता. सोनसाखळी चोरीप्रकरणी तक्रारदार यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावर पोलीस निरीक्षक राजीव सकपाळ यांच्या पथकातील उपनिरीक्षक दिगंबर पगार, राजेंद्र पेडणेकर, सूर्यवंशी, चव्हाण आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीला गजाआड केले.